ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात आजही धामापूर नळपाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा अशक्य ; नगरपरिषद प्रशासना तर्फे व्यक्त केली गेली दिलगिरी.

मालवणात आजही धामापूर नळपाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा अशक्य ; नगरपरिषद प्रशासना तर्फे व्यक्त केली गेली दिलगिरी.

प्रकाशन: 08 Nov 2023 01:58 AM
वाचन संख्या 196

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला पाणी पुरवठा करणार्या मुख्यवाहिनीच्या दुरुस्ती चे काम परवा सायंकाळ पर्यंत करण्यात आले होते. परंतु परवा रात्री उशिरा दुरुस्ती केलेल्या कामाच्या बाजूला पून्हा मुख्यवाहिनी फुटली आणि पाणी वाहुन जाऊ लागले. या कारणास्तव काल सकाळ पासून पाणीपुरवठा कर्मचारी मुख्यवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताहेत, काम अजुन पर्यंत पुर्ण न झाल्यामुळे आज ८ नोव्हेंबरला देखील रोजी मालवण शहर, कुंभारमाठ, पाॅलिटेक्निक आणि अन्य भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याबद्दल मालवण नगरपालिका प्रशासना तर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. हे दुरुस्तीचे काम पूर्ण होतास तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत होइल तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स