ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरेतील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान यांच्या 'गुरूद्वादशी उत्सव २०२३' चे आयोजन.

मसुरेतील श्री समर्थ बागवे महाराज संस्थान यांच्या 'गुरूद्वादशी उत्सव २०२३' चे आयोजन.

प्रकाशन: 08 Nov 2023 01:48 AM
वाचन संख्या 235

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील सुप्रसिद्ध अध्यात्मिक केंद्र देऊळवाडा दत्त मंदिर येथे श्री समर्थ बागवे महाराज संस्थान यांच्या वतीने शुक्रवारी १० नोव्हेंबरला गुरूद्वादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री दत्त गुरुंची पूजा, अभिषेक हे विधी होणार असून ११ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ महाप्रसाद असून ७ वाजता स्थानिक भजनांचे सादरीकरण होणार आहे. रात्री ९ ; ३० वाजता दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘सहस्त्रनागबळी’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या गरूद्वादशी २०२३ उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान (मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर) यांच्या स्थानिक व मुंबई कमिटी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स