कणकवलीत डॉ. सूर्यकांत तायशेट्ये यांच्या हाॅस्पीटल जवळ आग..!
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्तीमत्व डॉ सूर्यकांत तायशेटे यांच्या हॉस्पिटल लगत असणाऱ्या घरामध्ये आग लागली. या आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. यामध्ये एसी वॉशिंग मशीन व अन्य साहित्य जळाले ही आग आज रविवारी रात्री दहाच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची घटना समजतात तत्परतेने कणकवली अग्निशामक देखील दाखल झाला होता. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी डॉक्टर विद्याधर तायशेठे, मिथुन ठाणेकर, अण्णा कोदे, व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)