उद्या आणि परवा मालवण शहर, कुंभारमाठ पाॕलिटेक्निक आणि अन्य भागात होणारा पाणीपुरवठा दुरुस्तीमुळे होऊ शकणार नाही ; प्रशासनाला सहकार्य करायचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या धामापूर नळपाणीपुरवठा योजनेची मुख्यवाहिनी मालवण – चौके – कुडाळ रस्त्याला (कासारटक्का) येथून कुंभारमाठ पर्यंतची लाईन पूर्णतः जिर्ण झालेली आहे. कासारटक्का येथे रोडक्राॕस केलेल्या रोडच्या मधोमध सद्यःस्थितीत लाईन बऱ्यापैकी फुटलेली आहे. रस्ता खोदुन, मोरीसाठी पुढील लाईन दुरुस्ती करता येईल. या लाईन मधून सद्यःस्थितीत बऱ्यापैकी पाणी वाहुन जात असल्यामुळे सद्यःस्थितीत धामापूर येथील पंपींग बंद आहे. त्यामुळे उद्या ६ आणि परवा ७ रोजी मालवण शहर, कुंभारमाठ पाॕलिटेक्निकल आणि अन्य भागात होणारा पाणीपुरवठा होऊ शकत नाही.
मुख्य वाहिनी वरिल लाईन दुरुस्तीचे काम जेवढ्या लवकर होईल. त्यासाठी मालवण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यां तर्फे प्रयत्न चालु आहेत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे व सहकार्य करायचे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)