ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी युवासैनिकांच्या पाठिशी सदैव खंबीर असल्याचा देवगड तालुक्यातल्या शिरगांव विभागीय बैठकीत दिला विश्वास ; बैठकीला मिळाला नागरीकांचा तुफान प्रतिसाद.

जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी युवासैनिकांच्या पाठिशी सदैव खंबीर असल्याचा देवगड तालुक्यातल्या शिरगांव विभागीय बैठकीत दिला विश्वास ; बैठकीला मिळाला नागरीकांचा तुफान प्रतिसाद.

प्रकाशन: 27 Oct 2023 02:45 PM
वाचन संख्या 113

युवासेना शिरगांव विभागप्रमुख पदी बंटी पवार तर देवगड उपतालुका प्रमुख पदी सचिन पवार यांची नियुक्ती.

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगांव विभागात युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी युवासेनेची विभागीय बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना शिरगाव विभागप्रमुख पदी बंटी पवार व देवगड उपतालुका प्रमुख पदी सचिन पवार यांची निवड करण्यात आली. त्यांना सुशांत नाईक यांनी निवडीची पत्रे देऊन अभिनंदन केले.सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगड तालुक्यात युवासेनेचा झंझावात सुरु आहे. शिरगांव विभागातील बैठकीला देखील नागरिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी सुशांत नाईक म्हणाले ची देवगड तालुक्यात युवासेनेच्या मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घराघरात शिवसेना रुजविण्यासाठी युवासैनिकांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. लोकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी युवासैनिकांनी सरसावले पाहिजे. युवासेना म्हणून कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी आम्ही राहणार आहोत. तसेच गांवागांवात प्रत्येक बूथनिहाय युवासेना संघटना वाढीसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती रवींद्र जोगल,युवासेना कणकवली उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, शाखाप्रमुख समीर तेली, उप शाखा प्रमुख अजित पवार, युवासेना शाखाप्रमुख राज कदम, उपसरपंच सुहास पवार, ग्रा. पं. सदस्य सुभ्रा मेस्त्री ,ग्रा. प. सदस्य जान्हवी सावंत, ग्रा. पं. सदस्य प्राजक्ता पवार, सचिन पवार, दिनेश पवार,राज लाड, रमेश पवार, अंकुश पवार, बळीराम पवार, नरेंद्र पवार, दादा तेली, गोविंद तेली, सागर पवार, संदेश पवार,दर्शना कदम, विनाया पवार, अनुसया पवार, स्वरा पवार, संदेश पवार, मुरलीधर पवार, शामा पवार, सहील कदम, राजू परब, संतोष पवार, गणेश पवार, संजय लाड, सचिन पवार, यश पवार, नागेश पवार, विजय पवार, बबन पवार उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स