आचरा येथील १९ वर्षीय युवक गणेश शामा निकम बेपत्ता ; कोणालाही आढळल्यास आचरा पोलिसांशी संपर्क साधायचे आवाहन.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा वरची वाडी येथील गणेश शामा निकम हा युवक त्याच्या राहत्या घरातून २४ ऑक्टोबरच्या रात्री ते २५ ऑक्टोबर च्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबतची फिर्याद राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याचा गांवात तसेच इतरत्र शोधून घेऊनही तो कुठेही आढळून न आल्याने राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली सुदेश तांबे करत आहेत. हा युवक कुठेही दिसून आल्यास ९४२१०२९६७६ या क्रमांकावर आचरा पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलिसांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)