ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालवण दौरा आणि किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकाम हटविणे यांचा काहीच सबंध नाही ; भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांचे स्पष्टीकरण.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालवण दौरा आणि किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकाम हटविणे यांचा काहीच सबंध नाही ; भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांचे स्पष्टीकरण.

प्रकाशन: 27 Oct 2023 02:21 PM
वाचन संख्या 176

राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम काहीजण करत असल्याचीही केली टीका.

मालवण | सुयोग पंडित : भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर जी काल कारवाई झाली त्या संदर्भात एका प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविणे संदर्भात सबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजविल्या आहेत. ३ ऑक्टोबर २०२३ च्या या नोटीसा ही लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने बजाविण्यात आल्या आहेत असे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले आहे. तक्रारदार नागरीकाने पर्यटन व्यावसायिक यांच्या अनधिकृत बांधकाम मुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाट याच्यावर बाधा येत आहे आणि या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही. काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार या मध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत असा आरोप करताना रविकिरण तोरसकर यांनी या विषयातील तो तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे असेही सांगितले आहे.

पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिना निमित्त होणारा मालवण दौरा ऐतीहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट मध्ये होणाऱ्या पुतळा यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे व त्याचा फायदा स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांनाच होणार आहे. त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यवसायिक यांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठच्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करीत आहे. त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा चालू आहे. लवकरच तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिक सोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तरी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत असे आवाहन भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स