मुणगे ज्युनिअर काॅलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यूनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा संपन्न झाली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, गुरुप्रसाद मांजरेकर, स्वप्नील कांदळगांवकर, झुंजार पेडणेकर, सौ कुमठेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, एन एल बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी सह विध्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)