मसुरेत साई मंदिर येथे साई पुण्यतिथी महोत्सव ; उद्यापासून २६ ऑक्टोबर पर्यंत चालणार साईभक्तीचा मेळा.
साईकृपा मित्रमंडळ मसुरे गडघेरा वाडी यांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे उद्या २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
२४ ऑक्टोबरला रोजी सकाळी ५ वाजता काकड आरती व साईंची विधिवत पूजाअर्चा होईल.
सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा. (पूजा मानकरी प्रसाद बागवे उभयता.)
दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद. संध्याकाळी ७ वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि आरती, प्रसाद वाटप. संध्याकाळी ८ वाजता दत्तप्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे सुश्राव्य भजन.
रात्री ९ वाजता भरतगड प्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे भजन.
दिनांक २५ ऑक्टोबरला
सकाळी ६ वाजता विधिवत साईंची पूजाअर्चा, दुपारी १२ वाजता महाआरती,
संध्याकाळी ७ वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि महाआरती..
रात्री ८ वाजता बजरंग बली प्रसादिक भजन मंडळ मसुरे कावावाडी यांचे सुश्राव्य भजन.
रात्री ९ वाजता स्थानिक विविध भजने आणि मसुरे गावामध्ये श्री साईंचा झुणका भाकर प्रसाद वाटप कार्यक्रम.
दिनांक २६ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता साईंची विधिवत पूजाअर्चा. दुपारी १२ वाजता श्री साई भंडारा, रात्री ८ वाजता टोकळवाडी प्रसादिक भजन मंडळ बुवा संतोष मसुरकर यांचे सुश्राव्य भजन. रात्री ९ वाजता ट्वेंटी-ट्वेंटी डबल भजन बारी.
स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी बुवा श्री संतोष कानडे, मृदुंग योगेश सामंत, तबला विकास देवळे विरुद्ध डुंगो कमाला प्रसादिक भजन शेलपि, बुवा श्री दिनेश वागदेकर, मृदुंगमणी सचिन राणे, तबला अजित मार्गी या भजनीबुवांमध्ये होणार आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन साईकृपा मित्र मंडळ मसूरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.