ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्यापासून मिळणार दिवाळीसाठीचा 'आनंदाचा शिधा' ; दर्जेदार शिधा पुरवठा करायचे कडक आदेश.

उद्यापासून मिळणार दिवाळीसाठीचा 'आनंदाचा शिधा' ; दर्जेदार शिधा पुरवठा करायचे कडक आदेश.

प्रकाशन: 24 Oct 2023 11:59 AM
वाचन संख्या 231

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : राज्य सरकार तर्फे यंदाचा दीपोत्सव तथा दिवाळी २०२३ साठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप उद्या बुधवारी २५ ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. तसे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यात या योजनेअंतर्गत १ कोटी ५८ लाख ३३ हजार ७१८ कार्डधारकांना लाभ दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत यापूर्वी चार वस्तू दिल्या जात होत्या. त्यात दिवाळीसाठी मैदा आणि पोहे यांचा समावेश केला आहे. यामुळे साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलो, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे प्रत्येकी अर्धा किलो, अशा सहा वस्तूंचा संच शंभर रुपयांत दिला जाणार आहे. कार्डधारकांना देण्यात येणार्‍या या संचातील वस्तूंच्या दर्जाबाबत दक्षता घ्या, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मैदा आणि रवा या वस्तूंची खाण्यायोग्य मुदत संपण्यास किमान ३ महिन्यांपेक्षा अधिक, तर अन्य ४ पदार्थांच्यासाठी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी राहणार नाही, याचीही खात्री करण्याची सूचना देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स