ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डेगवेतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

डेगवेतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 23 Oct 2023 11:44 AM
वाचन संख्या 87

डेगवे गांवात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे गांवातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डेगवे गावात प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला पन्नास रकत दात्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे यावेळी मोफत डोळे तपासणी व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली त्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. चष्मा वाटप कार्यक्रमासाठी देसाई ऑप्टिशियन चे प्रोप्रायटर रामा देसाई व डॉ. सदानंद देसाई तसेच अमृत देसाई यांनी विशेष सहकार्य केले.

युवा उद्योजक श्री.विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी गांवातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवे च्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स