ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे चांदेरवाडीचा कु. तनिष्क मुळीक याची स्पर्धात्मक 'धाव' आता अनुभवणार राज्यस्तर.!

मसुरे चांदेरवाडीचा कु. तनिष्क मुळीक याची स्पर्धात्मक 'धाव' आता अनुभवणार राज्यस्तर.!

प्रकाशन: 23 Oct 2023 11:35 AM
वाचन संख्या 106

मसुरे | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सांगली द्वारा सांगली क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलचा मसुरे चांदेरवाडी येथील आठवीतील विद्यार्थी कु. तनिष्क महेश मुळीक याने घवघवीत यश मिळवत चंद्रपूर येथील राज्य स्तरिय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कु. तनिष्क याने विभागीय स्तरावर १४ वर्षांखालील मुले ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक आणि ६०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

त्याला ताराचंद पाटकर, पालक महेश मुळीक, क्रीडा शिक्षक समीर गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर आणि सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी तनिष्कचे विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स