ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेडी येथे कोकण संस्थेच्या माध्यमातून वॉटर एटीएम..!

रेडी येथे कोकण संस्थेच्या माध्यमातून वॉटर एटीएम..!

प्रकाशन: 23 Oct 2023 11:52 AM
वाचन संख्या 86

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथे काल ‘नॅब समृद्धी फायनान्स’ या कंपनीच्या सहकार्याने ‘कोकण’ संस्थेने येथील वॉटर एटीएमचे लोकार्पण केले. रेडी ग्रामपंचायत येथे झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकरी अधिकारी विनायक ठाकूर (पाणी व स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग) यांनी फित कापून नुकतेच उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, श्री मंगेश कामत ( माजी पंचायत समिती सदस्य.रेडी)
रामसिंग राणे – सरपंच, रेडी ग्रामपंचायत, सौ.नमिता नागोळकर – उपसरपंच रेडी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल उपस्थित होते.

या गांवाला स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या सी एस आर निधीतून या गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र देऊन मदतीचा हात दिला. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेडी गाव आणि विभागातील २० हजाराहून अधिक लोकांना याचा लाभ होणार असून लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोकण संस्थेचे अजिंक्य शिंदे, अवंती गवस, समीर शिर्के, भावना साटम, प्रदीप पवार, हनुमंत गवस शशिकांत कासले बाळकृष्ण शेळके, कुणाल चव्हाण यांनी मदत केली. आजी – माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश सावंत यांनी तर आभार अजिंक्य शिंदे यांनी मानले.

समाजात वाढदिवस बरेच जण वेगवेगळ्या मार्गाने लाखो रुपये खर्च करून साजरे करतात पण असे वाढदिवस लोकांच्या दोन – पाच दिवस स्मरणात राहतात पण कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल हे दरवर्षी आपला वाढदिवस समाजाभिमुख कार्यक्रम करून साजरा करतात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स