ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पोलिस परेड मैदानावर शहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना स्मृती वंदना.

पोलिस परेड मैदानावर शहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना स्मृती वंदना.

प्रकाशन: 21 Oct 2023 07:13 PM
वाचन संख्या 210

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत आज सिंधुदुर्ग नगरीतील ( ओरोस ) जिल्हा पोलिस परेड मैदानावर शहीद पोलिस स्मृती दिन संपन्न झाला.

२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लड़ाख़ मधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा ‘हॉटस्प्रिंग’ या ठिकाणी भारताचे १० पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दया धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या वीर पोलिस जवानांनी भारतीय सीमेचे रक्षण करताना दाखविलेल्या त्या अलौकीक शौर्याची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्र निष्ठेची व कर्तव्य निष्ठेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीपित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारत भर ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून वर्षभरात १ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झाली, त्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे परेड मैदानावर पोलीस स्मृती दिन साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करत स्मृती वंदना दिली.

पोलीस स्मृती दिन परेड श्री. किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री. रामदास पालशेतकर यांचे नेतृत्वाखाली असलेल्या प्लाटूनने शोक सलामीव्दारे मानवंदना दिली. यावेळी दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झाली अशा बोरांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या संबंधीत प्लाटूनने हवेत ३ वेळा गोळीबार करून मानवंदना दिली. शहीद जवानांना मानवंदना दिल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. किशोर तायडे व पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी शहीद पोलीस स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहीली. पोलीस स्मृती दिन परेडकरीता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच मुख्यालयाचे बँड पथक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स