ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट.

प्रकाशन: 21 Oct 2023 07:59 PM
वाचन संख्या 245

मालवण | प्रतिनिधी : यंदा ‘नवरात्रोत्सव २०२३’ निमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट देऊन  देवींचे  दर्शन घेतले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये आचरा गाऊडवाडी येथील श्री देवी संभादेवी मंदिर, आचरा बंदर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, आचरा हिर्लेवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, आचरा वरचीवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, तारकर्ली रांजण नाला येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, मालवण शहर गजानन महाराज मंदिर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, मालवण शहर बांगीवाडा  सार्वजनिक नवरात्रोत्सव, देवबाग येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, कुंभारमाठ येथील श्री देवी जरी मरी मंदिर, वडाचापाट येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव याठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी देवस्थान मंडळ व नवरात्रोत्सव मंडळांच्या   वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
          
यादरम्यान मालवण शहर येथे शिवसेना तालुकाप्रमुख  हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, मनोज मोंडकर, महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, पर्यटन उद्योजक अन्वय प्रभू, मयु पारकर,युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे व इतर उपस्थित होते. तारकर्ली येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, राजू मेस्त्री, शाखाप्रमुख आबा केळुसकर उपस्थित होते.

आचरा येथे विभागप्रमुख समीर लब्दे, सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर, विनायक परब, अनुष्का गांवकर, नारायण कुबल, माणिक राणे, नितीन घाडी, पप्पू परुळेकर, चंदन पांगे, दिलीप कावले, सदानंद घाडी, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, परेश तारी, सौ वाडेकर,सुंदर आचरेकर, सचिन बागवे, प्रवीण मुणगेकर, शेखर मुणगेकर, संजय वायंगणकर, प्रिया मेस्त्री, संदीप तांडेल, बाबा मालवणकर उपस्थित होते तर आचरा वरचीवाडी येथे गौरव पेडणेकर, अर्चन पांगे, जितेंद्र जोगळेकर, आबा आंबेरकर, यश मिराशी, राजू कांदळकर उपस्थित होते.
        
वडाचापाट येथे प्रमोद पाटकर, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, अजित भोगले, उमेश मुणगेकर, श्रीकांत पाटकर यांच्यासह त्या त्या ठिकाणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित गटाचे पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स