ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ऐन मासेमारी मोसमात रापणीची जाळी तुटल्याने दोन लाखाचे नुकसान!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ऐन मासेमारी मोसमात रापणीची जाळी तुटल्याने दोन लाखाचे नुकसान!

प्रकाशन: 11 Oct 2021 02:51 PM
वाचन संख्या 48

मुणगे आपईवाडीतील मच्छिमार झाले हतबल..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अरबी समुद्रामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या लाटांचा फटका देवगड तालुक्यातील मुणगे येथील नवी रापण आपईसंघ यांच्या रापणीला बसला आहे. रापणी साठीची जाळी खडकाना लागून तुटून वाहून गेल्यामुळे समारे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. आताच हंगाम चालू होऊन काही दिवस झाले असताना दोन लाखांचा फटका या मच्छिमारांना बसल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी रापणी व्दारे मच्छीमारी करण्यासाठी येथील नवी रापण संघ मुणगेचे अध्यक्ष दाजी मोर्वेकर, सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत, अशोक मुणगेकर, संतोष ठुकरूल, नारायण सावंत, कुणाल सावंत, दिपक पाटकर, संजय परब,दाजी सावंत, बाबू राणे, हरिष परब, बाळकृष्ण परब आदी होडीतून रापणीची जाळी पाण्यात सोडत गेले होते. जाळी पाण्यात सोडून होडी समुद्र किनारी आल्या नंतर रापणीची जाळी ओठण्यास सुरुवात केली. यावेळी समुद्राच्या अचानक पणे वाढलेल्या पाणी व लाठांमुळे रापणीची जाळी समुद्रातील खडकाना अडकून व पाण्याच्या लाठांमुळे सुमारे २४/ २५ पाटे (जाळ्यांचे जोडलेले भाग ) वाहून गेले त्यामुळे जाळ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.पाऊस कमी झाल्यानंतर या रापण संघाने रापण लावण्यास सुरुवात केली होती. परंतु ऐन मासेमारीच्या मोसमामध्ये रापण संघाचे असे मोठे नुकसान झाल्यामुळे मोसमामध्ये मासेमारी करणे शक्य होणार नसल्याने ते सुध्दां नुकसान होणार आहे. मागिल वर्षीसुध्दा अशाच पध्दतीने मासेमारीच्या मोसमामध्ये पाऊस पडत रहिल्यामुळे रापणसंघाना रापणी लावण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे फारमोठे आर्थिक नुकसान झाले होते असे नवी रापण आपईसंघाचे सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत यानी बोलताना सांगितले. या रापण संघामधील सर्व सदस्य हे मोलमजुरी करणारे म्हणजेच हातावर पोट असणारे असल्याने झालेले नुकसान आणि आता ऐन मासेमारीच्या मोसमामध्ये होणारे आर्थिक नुकसान यामुळे खचून गेले आहेत. तातडीने नुकसान भरपाईची मागणी दादा सावंत यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स