ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हळवल ग्रामपंचायत करतेय निर्मळ व निर्धोक देवदर्शनाच्या वाटा ...!

हळवल ग्रामपंचायत करतेय निर्मळ व निर्धोक देवदर्शनाच्या वाटा ...!

प्रकाशन: 11 Oct 2021 02:31 PM
वाचन संख्या 92

हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य..

हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई…

कणकवली | उमेश परब ( विशेष वृत्त ) : कोकणात श्रावण महिन्यानंतर उत्सव व भक्तिसोहळ्यांना चेतना मिळते . देवदर्शन हा एक महत्वाचा टप्पाही त्यामध्ये असतो. पाऊस नुकताच ओसरला असल्याने विविध देवळांकडे जाणार्या छोट्या मोठ्या मुख्य व आडवाटांवर गवत,झाडेझुडुपे यांचे साम्राज्य वाढलेले असते. पाऊस कमी झाल्याने ऊब व सूर्यस्नान यांसाठी सृष्टीतील अनेक सरपटणारे जीव या वाढलेल्या गवतांमध्ये व झुडुपामध्ये आश्रय घेतात आणि ते गवत जर माणसांच्या म्हणजे हळवलमधील नागरिकांच्या पायवाटेवर असेल तर कुठलीतरी अघटित घटना घडू शकते याचा सारासार विचार करुन  हळवल ग्रामपंचायतच्या माध्यमातून हळवल गावातील मंदिरे व महत्वाच्या पायवाटांची साफसफाई करण्यात येत आहे.
हळवल गावात वार्षिक दसरोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गावातील मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने देवतांसोबत गावभेटी साठी निघतात. या प्रवासात मिळणाऱ्या वाटा रानटी वनस्पतीमुळे बंद अवस्थेत असतात अशा परिस्थितीत त्याच वाटेने गावकरी प्रवास करत असतात. ही बाब लक्षात येताच हळवल सरपंच दीपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ यांच्या संकल्पनेतून हळवल गावातील मंदिरे व पायवाटा साफ करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. गावातील मंदिरे व पायवाटा यांची साफसफाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी एकमुखाने घेत ही मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या काळात निधीची कमतरता असल्यामुळे काटकसर करत ही मोहीम ग्रामपंचायत हळवलने हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय स्तुत्य असून हे काम आदर्शवत असल्याचे हळवल गावातील ग्रामस्थांचे म्हणणे असून हळवल सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच कर्मचारी यांचे हळवलवासियांनी आभार व्यक्त केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स