ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आज ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरांत सामूहिक नामःस्मरण सोहळा ; देवगड हडपीड मठातही होणार नामःस्मरण.

आज ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरांत सामूहिक नामःस्मरण सोहळा ; देवगड हडपीड मठातही होणार नामःस्मरण.

प्रकाशन: 19 Oct 2023 12:21 AM
वाचन संख्या 178

श्री स्वामी समर्थांच्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ आगमन दिनाचे औचित्य साधून सोहळ्याचे आयोजन !

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीतील आगमन दिनानिमित्त (ललिता पंचमी) सामुदायिक नामःस्मरण करण्यात येणार आहे. राज्यभरातील ८५ शहरात आज गुरुवारी १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ५.२५ वाजता लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती डॉ. मनोहर मोरे यांनी दिली.
ललिता पंचमीला स्वामींचे अक्कलकोट येथे आगमन झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे व श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराज यांचे वंशज अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षांपासून समर्थ नगरी परिवार अक्कलकोटच्या माध्यमातून राज्यभरात स्वामी नामप्रसार सेवा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी विश्व शांती व मनःशांतीकरिता सामुदायिक नामःस्मरण करण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५. २५ वाजता एकाच दिवशी एकाच वेळेस राज्यभरात हा सोहळा साजरा होणार आहे. यात लाखो स्वामीभक्त सहभागी होतील.

श्री स्वामींचे आगमन अक्कलकोटकरांसाठी भाग्याचे ठरले. त्यांनी प्रदीर्घकाळ अक्कलकोट पावनभूमीमध्ये व्यतीत केला. आपला देहत्याग याच ठिकाणी वटवृक्षाखाली ठेवला. त्यांची समाधी देखील येथेच आहे. त्यामुळे ललित पंचमी हा दिवस अक्कलकोटकराकरिता महत्वाचा आहे. अक्कलकोट येथील लोकापुरे हॉल येथे सामुदायिक नामःस्मरण होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी दुकानात व घरात महाराजांच्या फोटोचे पूजन करून महाराजांचे स्वागत करावे, असे आवाहन वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

अक्कलकोट, सोलापूरसह वालचंद नगर, पुणे, हडपसर विवेवाडी, धनकवडी, गणेश नगर, निगडी, डेक्कन, सातारा, तासगाव, मिरज, म्हैसाळ, कोल्हापूर, कराड, गारगोटी ,चांदेकरवाडी, देवगड हडपिडमठ, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, भुईगाव वसई, बोरिवली, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर , चंद्रपूर, नांदेड, धुळे आदीसह कर्नाटकातील चिकोडी, शहाबाद गोवा राज्यातील फोंडा गाव, राजस्थान व हरियाणा तथा जम्मू येथे हा उत्सव एकत्रित नामस्मरणामध्ये साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स