ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मालवण भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  घेतली नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांची भेट.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मालवण भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांची भेट.

प्रकाशन: 19 Oct 2023 12:51 AM
वाचन संख्या 231

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या प्रमुख भाजप पदाधिकार्यांनी मालवण नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची विशेष भेट घेतली. येत्या ४ डिसेंबरला होणाऱ्या ‘नौसेना दिन’ कार्यक्रमा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण शहरात आगमन येणार आहेत. या निमित्त मालवण शहरात आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी व यानिमित्ताने येणाऱ्या पर्यटकांना मालवण शहर पर्यटन दृष्ट्या आकर्षित होण्यासाठी आवश्यक सुविधा व उपलब्ध होण्यासाठी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली.

या भेटी दरम्यान राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी लाईट लेझर साऊंड शो प्रस्तावित करावा, मालवण शहरातील ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला ते कर्नाटक बस्नुर अशी सागरी यात्रा केली होती या विषयाला धरून अत्याधुनिक आर्ट गॅलरी करण्यात यावी यासाठी मालवण नगरपालिकेने तात्काल सिंधू रत्न योजनेमध्ये निधीची मागणी करून प्रकल्प सादर करण्यात यावा तसेच मालवण शहरामध्ये मालवण नगरपालिकेच्या वतीने रंगरंगोटी करून देण्यात यावी आणि मालवण बंदर जेटी ते राजकोट बंधारा कम रस्ता कामा त सुरुवात करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले मालवण शहरातील सतरा रस्ते ताबडतोब डांबरीकरण करण्यास घ्यावे व मालवण शहरातील गटारां वर तात्काळ लाद्या बसवण्यात याव्यात असेही भाजपा पदाधिकार्यांनी सूचीत केले. ऐतिहासिक शिवकालीन मोरयाचा धोंडा ते राजकोट पर्यंतचे समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात यावेत व त्यासाठी आवश्यक स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. किनारपट्टीवरील लाईटची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

मुख्याधिकारी यांनी किनारे साफ करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री साठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच मोठ्या टायरचा ट्रॅक्टर मंजूर झाल्यास किनारपट्टी स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. तसेच मालवण नगरपालिकेच्या सभागृहाला आधुनिक सुविधा युक्त करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न करावेत अशी विनंती केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या सूचनेला अनुसरून आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून यासंदर्भात ताबडतोब प्रस्ताव सादर करावे अशा सूचना पण देण्यात आल्या होत्या . पालकमंत्री यांच्याशी फोनवरून संभाषण होता प्रस्ताव ताबडतोब देऊन निधी उपलब्ध करून देऊ यात कोणती शंका नसावी असा शब्द दिलेला आहे .यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने आवश्यक असणाऱ्या सुविधा मालवण नगरपालिका यांनी तात्काळ करून घ्याव्यात यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे अभिवचन देण्यात आले आहे .

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याबरोबर भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे , आप्पा लुडबे, जगदीश गांवकर, अशोक तोडणकर, पंकज सादिये , सौ. पूजा करलकर ,सौ.पूजा सरकारे, आबा हडकर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, संदीप मालंडकर उपस्थित होते. मालवण नगरपालिकेच्या वतीने अभियंथा श्रीमती हळदणकर, वरिष्ठ लिपिक महेश परब व वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी सुधाकर पाटकर उपस्थित होते.

फोटो सौजन्य : मालवण शहर भाजप

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 296

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स