आचरा येथे श्री महापुरुष मित्रमंडळ, वरची वाडी आयोजीत व सिंहगर्जना गृप पुरस्कृत जिल्हास्तरीय 'खुली एकेरी नृत्य स्पर्धा २०२३' चे आयोजन.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे श्री महापुरुष मित्रमंडळ आयोजीत व सिंहगर्जना गृप पुरस्कृत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता आचरा हायस्कूल शेजारी ही स्पर्धा आयोजीत केली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रुपये २००/_ असून दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे. पहिल्या २० स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक स्पर्धकाने त्याचे आधारकार्ड सोबत आणावे व २१ ऑक्टोबर २०२३ ला सायंकाळी ६ :३० पूर्वी हजर रहावे अत्यावश्यक असेल. स्पर्धकांनी त्यांचे गाणे पेनड्राईव्ह तथा सीडी स्वरुपात आणावे असे स्पष्ट केले गेले आहे. स्पर्धेच्या आयोजनाविषयीचे सर्व अधिकार आयोजकांचे असून परिक्षकांचाच निर्णय अंतिम राहील असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तरी अत्यंत खिलाडूवृत्तीने ही स्पर्धा संपन्न व्हावी असेही स्पष्ट केले गेले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास स्पर्धेची तारीख व वेळ बदलली जाईल असे आयोजकांनी विशेष नमूद केले आहे.
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी हर्षद धुरी -९४२०८०५२२९, ९०२२०८८०२३ आणि लिलेश मांजरेकर – ९४०३५५८३५८,
वेदीका कांदळगांवकर – ७५८८०८४७०९ यांना संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)