ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या वतीने खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन.

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन.

प्रकाशन: 18 Oct 2023 03:20 PM
वाचन संख्या 121

उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही होणार सत्कार.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने त्यांचा विशेष भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी २१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा सत्कार सोहळा होणार आहे. त्याचबरोबर उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभुगावकर, युवतीसेना प्रमुख समन्वयक अधिकारी सौ. शिल्पा खोत यांच्यासह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स