ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणातील कोरगांवकर यांच्या मालवण टेबल टेनिस ॲकॅडमीत टेबल टेनीस प्रशिक्षणाचे आयोजन ; माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीम. इंदू एन आर करणार विशेष मार्गदर्शन.

मालवणातील कोरगांवकर यांच्या मालवण टेबल टेनिस ॲकॅडमीत टेबल टेनीस प्रशिक्षणाचे आयोजन ; माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीम. इंदू एन आर करणार विशेष मार्गदर्शन.

प्रकाशन: 18 Oct 2023 03:37 PM
वाचन संख्या 185

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रेवतळे येथील कोरगांवकर यांच्या मालवण टेबल टेनिस
ॲकॅडमीत शनिवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ३ ते ६ आणि रविवारी २२ ऑक्टोबरला सकाळी ८ ते ११ या वेळेत टेबल टेनिस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

माजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीम. इंदू एन आर या प्रशिक्षणात विशेष मार्गदर्शन करणार आहेत. श्रीम. इंदू एन आर या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियन होत्या तसेच सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मिळविली होती शिवाय वर्ड चॅम्पियन शिप, दोन काॅमनवेल्थ गेम्स, तीन एशियन चॅम्पियनशिप, लेबेनाॅन ओपन, कतार ओपन, ब्राझील ओपन, यू .एस्.ओपन, एशिया कप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस पटूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग सचिव हेमंत वालकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स