ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज निर्माण केल्याने दुर्गम भागातून येणार्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला सुद्धा डॉक्टर होण्याची संधी मिळू शकली ; मसुरे डांगमोडे गांवचे आदित्य ठाकूर यांची बेस्ट पेपर ॲवाॅर्ड बद्दल प्रतिक्रिया.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज निर्माण केल्याने दुर्गम भागातून येणार्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला सुद्धा डॉक्टर होण्याची संधी मिळू शकली ; मसुरे डांगमोडे गांवचे आदित्य ठाकूर यांची बेस्ट पेपर ॲवाॅर्ड बद्दल प्रतिक्रिया.

प्रकाशन: 06 Oct 2023 04:45 PM
वाचन संख्या 215

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या तृतीय वर्ष एमबीबीएस ला असणाऱ्या आणि मसुरे डांगमोडे गांवचे आदित्य ठाकूर यांनी महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे अस्थीविषयक ( ऑर्थोपेडिक ) रुग्णासंबंधी सादर केलेल्या पेपरला महाराष्ट्रात बेस्ट पेपर अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आदित्य ठाकूर यांना प्राध्यापक म्हणून डॉक्टर आर एस कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य केले. मेडिकल कॉलेजचे संस्थापक केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकूर यांचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

१ जानेवारी ते ३० ऑगस्ट या कालावधीत रुग्णांच्या फ्रॅक्चर होण्याचे कारण काय आहे याचे संशोधन करण्यात आले. या संबंधी काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. त्यातून ज्या गोष्टी समोर आल्या त्यातून पाय हात फॅक्चर झाल्यावर ते कसे सांधता येतात यावर अभ्यास करून त्यासंबंधीचा पेपर महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औरंगाबादला सादर करण्यात आला. सर्व राज्यातून समितीसमोर पेपर पाठवण्यात येतात. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांमधून पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आणि मसुरे डांगमोडे गांवचे आदित्य ठाकूर यांना बेस्ट अवॉर्ड मिळाल्याबद्दल आदित्यचे मार्गदर्शक डॉक्टर आर एस कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान आदित्य ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता पडवे येथे केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज निर्माण केल्याने दुर्गम भागातून येणार्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यालाही डॉक्टर होण्याची संधी मिळू शकली अशी प्रतिक्रिया दिली. आई-वडील आणि माझा परिवार आणि या पेपर साठी मला नेहमीच मार्गदर्शन करणारे प्रोत्साहन देणाऱ्या डॉक्टर आर एस कुलकर्णी यांचे आभार व्यक्त करताना मेडिकल कॉलेजमुळे हे सर्व शक्य झाल्याचेही आदित्य ठाकूर यांनी सांगितले. यापुढे सुद्धा एस एस पी एम मेडिकल कॉलेज चे नाव विविध क्षेत्रांमध्ये पुढे आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी मनोगत व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स