श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ,बांदा आळवाडाच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ‘श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बांदा, आळवाडा’ यांच्या अध्यक्षपदी साईशकुमार केसरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी प्रवीणराज हरमलकर यांची तर खजिनदारपदी क्षितिज भोगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री साईबाबा मठात आयोजित मंडळाच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत नऊ दिवस होणाऱ्या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रितम हरमलकर, आप्पा धामापुरकर, सूर्यकांत निब्रे, मंदार धामापूरकर, प्रथमेश गवळी, विठ्ठल गवळी, प्रथमेश निब्रे, रवींद्र हरमलकर, सिद्धेश परब, दिपेश हरमलकर, रुपेश बांदेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)