ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एखाद्याचा जीव गेल्या नंतर 'बांदा - दाणोली' मार्ग दुरुस्त होऊन प्रवास सुरक्षित होणार का ; वाहनचालक व नागरीकांचा सवाल.

एखाद्याचा जीव गेल्या नंतर 'बांदा - दाणोली' मार्ग दुरुस्त होऊन प्रवास सुरक्षित होणार का ; वाहनचालक व नागरीकांचा सवाल.

प्रकाशन: 06 Oct 2023 03:45 PM
वाचन संख्या 233

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ‘बांदा – दाणोली’ मार्गावर विलवडे, वाफोली गावात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अती पावसामुळे रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे.

गणेश चतुर्थीपूर्वी या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर रस्ता वाहतुकिस सुरळीत करण्या संबधीत काहीच हालचाल दिसुन आली नाही. उलट रस्‍त्याची समस्या खुपच बिकट बनली आहे. विलवडे टेंबवाडी, सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे,काही महिन्यापुर्वी वाफोली धरणा नजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलेमोठे खड्डे, तर वाफोली गांवाजवळील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरील जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वाहनचालकांसह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.या खड्ड्यांमुळे रस्त्यावर हा वाहनांचा मार्ग आहे की नाही हेच कळत नाही आहे.या मार्गावरून वाहने चालवणे तारेवरची कसरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी संबधीत विभागाला एखाद्याचा बळी गेल्यावर जाग येणार का, नंतरच रस्ता दुरुस्त होऊन प्रवास सुरक्षित होणार का, असे सवाल वाहन चालकांकडून विचारलू जात आहेत. यापुढे या मार्गावर खड्ड्यामुळे अपघातात दुर्घटना घडल्यास संबधीत जबाबदारी घेणार का, असाही संतप्त सवाल स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक बनले आहे.शाळेतील विद्यार्थाना प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या संबधीत विभागाकडून गणपती पूर्वी तातपुरती मलमपट्टी केली. परंतु मुसळधार पावसाने मार्गावरील खड्ड्यांचा आकार मोठा झाला. विलवडे व वाफोली पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून ठिकठिकाणी महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबधित विभागाने तातडीने योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी वाहन चालकांकडून व नागरीकांकडून होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स