मालवणात माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ग्रामीण रुग्णालयात, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ९ ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ अशा वेळेत हे शिबीर आयोजीत करण्यात आले असून मालवण शहर व आसपासच्या भागातील गरजूंनी ‘मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया’ यासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)