मुणगे कारीवणेवाडितील अभिजित व महेश सावंत यांचे शैक्षणिक दातृत्व ; मुणगेतील श्री भगवती हायस्कूलच्या प्रयोगशाळेला दिली प्रयोग साहित्यांची भेट.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे कारीवणेवाडी येथील अभिजित सावंत व महेश सावंत यांनी श्री भगवती हायस्कुलच्या प्रयोगशाळेसाठी विज्ञान साहित्य भेट दिले. या साहित्यामध्ये सूक्ष्मदर्शक, विविध काचपट्टी, ध्वनीचे परावर्तन बोर्ड, ब्यारोमिटर, श्वसन संस्था, होपचे उपकरण, ओहोम उपकरण आदी साहित्याचा समावेश आहे. यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी लक्ष वेधले होते.
साहित्य भेट देताना संस्था व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, शिक्षक प्रसाद बागवे उपस्थित होते. साहित्य भेट दिल्याबद्दल सावंत बंधुंचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)