मुणगे येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा संगीतकार भार्गव लब्दे यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे करिवणेवाडी येथील प्रसिद्ध भजनी बुवा,प्रसिद्ध मृदुंग वादक भजन शेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व श्री भार्गव उर्फ भाई महादेव लब्दे (वय ८० वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. भार्गव यांचे मुणगे गांवातील कला, क्रीडा, भजन, सामाजिक, संगीत, शेत्रात मोठे योगदान होते. अनेक युवा भजनी बुवा ना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.भजन क्षेत्रात मध्ये त्यांचे मोठे नांव जिल्ह्यात होते. हार्मोनियम आणि मृदंग वादन ही त्यांची कला अनेक नवोदित वादकांना प्रेरणा देणारी होती . संगीत क्षेत्रामध्ये भार्गव यांनी अनेक नवोदित कलाकारांना घडविले होते.अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले होते.त्यांची गायकी ही शास्त्र शुद्ध असायची. अनेक राग ते लीलया गात असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई,नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार असून येथील शांतनु लब्दे तसेच शुभदा लब्दे, सौ.रुपाली इंगळे, सौ.माधवी बागवे यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)