ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मुणगे येथील श्री भगवती देवालयात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ;२१ दिवसांच्या श्री गणेशोत्सवाचे औचित्य.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे येथील श्री भगवती देवालयात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ;२१ दिवसांच्या श्री गणेशोत्सवाचे औचित्य.

प्रकाशन: 02 Oct 2023 01:24 AM
वाचन संख्या 233

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे गांवची ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात २१ दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

काल १ ऑक्टोबरला सायंकाळी महाआरती, रात्री बुवा उत्तम मुणगेकर तसेच बुवा सुभाष मसुरकर (भंडारवाडी) यांचे संगीत भजन संपन्न झाले. आज २ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री १० वाजता यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालंडकर यांच्या सौजन्याने बाल मित्रमंडळ आचरा वरची वाडीचे दिंडी भजन आणि श्री पावणाई दिंडी भजन दाभोळे यांचे दिंडी भजन, त्यानंतर बुवा समिर महाजन व बुवा राजेंद्र प्रभू यांची संगीत भजने, ३ ला बुवा अविनाश राऊत (कारिवणेवाडी) व बुवा रामचंद्र घाडी (सडेवाडी) यांची संगीत भजने, ४ ला सायंकाळी ७ वाजता महाआरती, त्यानंतर बुवा विनोद सावंत (सावंतवाडी) व बुवा दीपक धुवाळी (सडेवाडी) यांचे संगीत भजन, रात्री १० वाजता ‘आंबा बागायतदार मुणगे’ यांच्या सौजन्याने पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना पावणाई देवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाटचे (ता. कणकवली) बुवा हेमंत तेली विरुद्ध कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळबुद्रुकचे (ता. कणकवली) बुवा सुजित परब, ५ ला सायंकाळी महाआरती, रात्री ९ वाजता रिक्षा चालक मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ मुणगे भगवती मंदिर यांच्या सौजन्याने ब्राम्हणदेव महिला मंडळ नाद-भोळेवाडी (ता. देवगड) यांचे समईनृत्य, रात्री बुवा अरविंद सावंत (सावंतवाडी) यांचे संगीत भजन, ६ ला सायंकाळी महाआरती, त्यानंतर बुवा दिपक तुरी (देऊळवाडी) व बुवा धाकोजी सावंत (सावंतवाडी) यांची संगीत भजने, ७ ला सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, रात्री १० वाजता २०x२० डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री पावणाई प्रासादिक भजन मंडळ वानिवडेचे (ता. देवगड) बुवा आनंद ऊर्फ बाबा हरम विरुद्ध श्री देवी सातेरी प्रसादिक भजन मंडळ पावशीचे (ता. कुडाळ) बुवा अरुण घाडी. ८ ला दुपारी ४ वाजता श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ मुंबई- डोंबिवलीचे मालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांचे महान पौराणिक दशावतारी नाटक ‘असुर संग्राम’. सायंकाळी महाआरती, रात्री बुवा पवन बोरकर (आडवळवाडी) यांचे संगीत भजन, ९ ला.

दुपारी दिडला आरती त्यांनतर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन सोहळ्याला सुरूवात होणार आहे. आडवळवाडी येथील समुद्र किनारी सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे.भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवी भगवती देवस्थान समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स