ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर प्रथम!

गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर प्रथम!

प्रकाशन: 02 Oct 2023 01:30 AM
वाचन संख्या 183

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल मणेरवाडी येथील गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कै. भास्कर मसुरकर यांच्या स्मरणार्थ मनोहर मसुरकर व कुटुंबियांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. द्वितीय क्रमांक विष्णू हडकर, तृतीय क्रमांक संदेश चव्हाण, उतेजनार्थ भाऊ फाटक, उत्कृष्ट मूर्ती बापू फाटक यांना पारितोषिके देण्यात आले.

परीक्षक म्हणून माजी मुख्याध्यापक प्रमोद लोके व श्री दानवे यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना अमरसेवा मंडळाचे अध्यक्ष भगवान मसुरकर व पदाधिकारी यांच्या उपस्थित रोख पारितोषिक व कायम स्वरूपी चषक देण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स