ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सांगावे रस्त्यावर बैल आडवा आल्याने अपघात...!

सांगावे रस्त्यावर बैल आडवा आल्याने अपघात...!

प्रकाशन: 09 Oct 2021 05:58 PM
वाचन संख्या 154

अपघातात फोंडाघाट येथील जिल्हा बँक व्यवस्थापक व त्यांच्या पत्नी जखमी..!

पत्रकार भूषण मेस्त्री,पत्रकार संजोग सावंत व सहकाऱ्यांचे सजग प्रसंगावधान…!

कणकवली | उमेश परब : फोंडाघाट येथून कनेडी मार्गे हरकुळ बुद्रुकच्या दिशेने येत असताना सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान सांगवे केळीचीवाडी नजीक बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात फोंडाघाट शाखेचे जिल्हा बँक व्यवस्थापक श्रीराम मराठे किरकोळ जखमी तर त्यांच्या पत्नी स्नेहल मराठे या गंभीर जखमी झाल्या आहेत.सौ. स्नेहल मराठे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तरवृत्त असे की, श्रीराम मराठे हे जिल्हा बँक फोंडाघाट येथील कामकाज आटपून पत्नी स्नेहल यांना सांगवे शाखेतून घेऊन हरकुळ बुद्रुक येथील घरी निघाले होते.मराठे व त्यांची पत्नी दुचाकीवरन येत असताना अचानक सांगवे केळीचीवाडी नजीक बैल समोर आला,आणि मराठे यांचा गाडी वरील ताबा सुटला,तिथेच अपघात घडला.या अपघातात दोघेही जखमी झाले आहेत रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागत असल्याने तातडीने त्यांना उपचारांसाठी भूषण मेस्त्री यांच्या मारुती व्हॅनमधून पत्रकार संजोग सावंत व सहकाऱ्यांनी दाखल करण्यासाठी मदत कार्य केले.जखमींवर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(फोटो : प्रातिनिधिक गुगल.)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स