ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
तेरेखोल खाडी पात्रानजिक 'अगर मगरची' स्थिती... !

तेरेखोल खाडी पात्रानजिक 'अगर मगरची' स्थिती... !

प्रकाशन: 09 Oct 2021 05:23 PM
वाचन संख्या 196

खाडीपात्रातील मगरींची वाढ पर्यावरणपूरक की मनुष्यजातीला घातक अशी शंका होतेय व्यक्त..!

विवेक परब | विशेष वृत्त : पर्यावरणाची वाढती हानी आता जागतीक स्तरावर नुसती समस्या म्हणून चर्चिली जात नाही तर त्यावर ठोस अशी पावले आंतरराष्ट्रीय वसुंधरा परिषद व यु.नो.ने उचलली आहेत. जैववैविध्य आणि जैविक संरचनेचा अभ्यास आणि जागृती हा आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा http://localhost/news/public/uploads/2030 सालापर्यंतचा अजेंडाही ठरवेला आहे.
इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजेच जैवविधतेची पुनरर्चना ह्या संकल्पनेवर आता पुढील सात वर्षे पर्यावरणविषयक कार्यक्रम जगभरात राबविले जात आहेत. परंतु हे कार्यक्रम राबविताना मनुष्यजात आणि पाळीव प्राण्यांनाही धोका निर्माण होणार नाही ना याची शंका आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल खाडीपात्रानजिकची गावे अभ्यासताना येते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल खाडीपात्रात शेकडो मगरींचे वास्तव्य आहे.गेली पाच ते सहा वर्षापुर्वी पासून खाडीपात्रात मगरींची वाढ दिसू लागल्या. दिवसेंदिवस मगरींच्या संख्येत झपाट्याने वाढत आहेत.बांदा ते सातार्डे या भागामध्ये भल्यामोठ्या मगरी पाण्या बाहेर  येत आहेत. पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याने मगरी भरवस्तीत येतात.या मगरींकडून पाळीव प्रण्यांवर व मनुष्यांनवर हल्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांनकडून मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.सिधुंदुर्ग जिल्ह्यातील वन कर्मच्यार्यांना मगरींना पकडण्याचे प्रशिक्षणच नसल्याने मगरींचा बंदोबस्त करण्यास वनखाते हतबल ठरत आहे.मगरीसाठी सुरक्षित व राखीव क्षेत्र तथा पार्क करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.वेळीच मगरींचा बंदोबस्त न केल्यास मगरींकडून पाळीव प्राणी व मनुष्यांवर हल्याच्या प्रमाणात वाढ होणार असल्याने ही तेरेखोल खाडीपात्राजवळील मनुष्यजातीसाठी धोक्याची घंटा तर नाही ना……!अशीच शंका सध्या व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स