ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गालगुंडाची साथ ; मुलांना जपायचे तज्ञ डाॅक्टर वर्गाचे आवाहन.

गालगुंडाची साथ ; मुलांना जपायचे तज्ञ डाॅक्टर वर्गाचे आवाहन.

प्रकाशन: 20 Sep 2023 12:35 PM
वाचन संख्या 171

कणकवली | प्रतिनिधी : गालगुंड तथा गालफुगी हा मुलांमधील संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे पावसाळा किवा उन्हाळा हे ऋतू सुरु होताना या आजाराचा त्रास होतो. सध्या ही साथ डोके वर काढू लागली आहे. सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने मुलांची वेळीच काळजी घ्यावी व प्राथमिक लक्षणे दिसू लागताच तपासणी करून घ्यावा असा सल्ला आरोग्यतज्ञांनी दिला आहे.

गालफुगी किंवा गालगुंड हा आजार संसर्गजन्य असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी हातांची स्वच्छता तसेच उपचार, लस घ्यावी लागते. हा आजार होऊ नये, यासाठी इतर मुलांना दूर ठेवणे गरजेचे असते. तसेच वेळीच उपचार सुरू करावेत असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

सुरुवातीला जबड्याला सूज येते. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. डोकेदुखी, सांध्यातील वेदना, तोंड कोरडे पडणे, सुजलेल्या पॅरोटीड ग्रंथी, ताप, भूक न लागणे किंवा मळमळ तथा अपचन अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत.

गालगुंड हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावे. तसेच लक्षणे आढळल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळ ९ महिन्याचे झाल्यानंतर त्याला एमएमआरचा पहिला डोस आणि त्यानंतर ६ महिन्यांनी दुसरा डोस द्यावा लागतो.

गालफुगी किंवा गालगुंड हा संसर्गजन्य आजार असून त्याला ‘मम्प्स’ असे म्हणतात. यात ताप, सर्दी, डोकेदुखी, कान दुखणे, पोटात दुखणे हे त्रास साधारणपणे होतात, या आजाराच्या विषाणूमुळे मेंदूला संसर्ग होऊ शकतो. यासाठी ताप कमी होणे, अधिकाधिक पाणी प्यायला देणे आणि आराम करणे महत्त्वाचे असते. तसेच वेळीच उपचार करावेत असे आवाहन बालरोग तज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स