ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तारकर्ली येथे एक पर्यटक बुडून बेपत्ता तर एक युवक अत्यवस्थ.

तारकर्ली येथे एक पर्यटक बुडून बेपत्ता तर एक युवक अत्यवस्थ.

प्रकाशन: 19 Sep 2023 09:23 PM
वाचन संख्या 249

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक बुडून बेपत्ता झाला तर त्याच्या सोबतचा एक युवक गंभीर आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज ४ वाजण्याच्या दरम्यान घडला. सैफियान दिलदार शेख (वय २४) रा. साकेडी मुस्लिमवाडी कणकवली असे बेपत्ता युवकाचे नांव आहे.

साकेडी मुस्लिमवाडी कणकवली येथील सैफियान दिलदार शेख़, साहिल इरफान शेख़, सावेज रियाज शेख़, अरबाज इम्तियाज शेख़, मतीन बबलू शेख़, कतील नाझीम काझी, उस्मान काझी, युसुफ काझी, साहिल शेख़, ज़ायेद शेख़ हे सर्वजण आज दुपारी दुचाकीने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते. सायंकाळी साडेतीन पावणे चार वाजण्याच्या दरम्यान ते समुद्रात उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने सैफियान शेख़ हा बुडून बेपत्ता झाला तर मतीन शेख़ याला बुडण्यापासून वाचविण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. शिवप्रसाद तेली, डॉ. पळसंबकर यांनी उपचार केले. मात्र त्याची तब्येत गंभीर बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलिस सुनील जाधव, पोलिस सुभाष शिवगण, पोलिसधोंडू जानकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 323

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स