ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुणगे रस्त्यावर मिठबावच्या युवकाचा आढळला मृतदेह ; कसून तपास सुरू व श्वानशपथक दाखल..!

मुणगे रस्त्यावर मिठबावच्या युवकाचा आढळला मृतदेह ; कसून तपास सुरू व श्वानशपथक दाखल..!

प्रकाशन: 18 Sep 2023 12:13 PM
वाचन संख्या 772

आचरा | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे रस्त्यावर मिठबाव येथील एक युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. तो रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने गाडीसह त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या युवकाचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध उलट्या अवस्थेत पडलेला असून गाडीचा दरवाजा तसेच गाडीच्या काचेवर, बोनेटवर व दरवाजावर अवजड वस्तूने आघात केल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे हे प्रकरण अपघात की घातपात याचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रयत्न आहेत.

याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे, सुधीर कदम, राजन जाधव, प्रसाद आचरेकर, स्वप्नील भोवर, स्वप्नील ठोंबरे यांच्यासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून कसून तपास सुरू झाला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स