ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खारेपाटण चेकपोस्ट येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची सुविधा ; युवा सेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा पुढाकार.

खारेपाटण चेकपोस्ट येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची सुविधा ; युवा सेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा पुढाकार.

प्रकाशन: 18 Sep 2023 12:34 PM
वाचन संख्या 127

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना युवा सेना प्रमुख ( शिंदे गट ) सुकांत वरुणकर यांच्या सौजन्याने व शिवसेना शिंदे गट पुरस्कृत मुंबई वरून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तासाठी उभारण्यात आलेल्या मोफत चहापान स्वागत कक्ष उभारला गेला आहे. याचे उद्धघाटन काल शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे व कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, खजिनदार भास्कर राणे, श्री लियाकत काझी, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, सौ अस्ताली पवार, श्री मंगेश ब्रम्हदंडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, केळवली शिवसेना विभाग प्रमुख श्री तनावडे, परवेज पटेल, शमशुद्दिन काझी, पोलीस कॉन्स्टेबल मारुती बराड, पराग मोहिते, ट्रॅफिक पोलीस प्रशांत धुमाळे, अमोल काळे तसेच शिवसेना कार्यकर्ते सौ नंदिनी पराडकर,देवानंद ईसवलकर वगैरे मान्यवर उपस्थित होते

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे कोकणात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांना सुरक्षित घेऊन येणाऱ्या एस टी चालक वाहक यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खाजगी वाहने तसेच एस टी बसने व रेल्वेने येणाऱ्या गणेश भक्तांना खारेपाटण येथे शिवसेना पक्षाच्या वतीने मोफत चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे गणेश भक्तांच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा प्रमुख संजय आंग्रे कणकवली पोलीस निरीक्षक शरद देठे यांचा युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरूणकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स