ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा ठरली अव्वल ; सौ. आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा ठरली अव्वल ; सौ. आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड

प्रकाशन: 13 Sep 2023 05:21 PM
वाचन संख्या 183

मसुरे | प्रतिनिधी : प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्राथमिक शाळा देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे आप्पे” या पाकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा वापर करुन शेवया, मोदक, लाडू, धपाटे असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी केली होती. केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक एकूण नऊ शाळांनी भाग घेतला

या स्पर्धेचे परीक्षण गटसाधन केंद्र मालवणच्या विषय तज्ञ सौ. आरती कांबळी व श्री. विकास रुपनर यांनी केले. आरोग्य विषयक लाभ, चव, मांडणी, इंधन बचत या मुद्द्यांआधारे परीक्षण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख श्री नारायण देशमुख, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, सौ शीतल मसुरकर व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेतील यशाबद्दल देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, सर्व शिक्षक व पालकांनी विशेष अभिनंदन करत तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स