ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीचा दबदबा ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व.

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीचा दबदबा ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व.

प्रकाशन: 13 Sep 2023 12:57 PM
वाचन संख्या 339

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या जय गणेश स्कूल मध्ये संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेत ‘मालवण टेबल टेनिस अकॅडमी’ ची मुले यशस्वी झाली.

१४ वर्षांखालील मुली विजयी ( जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण ): आर्या दिघे,वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण, श्रिया नरे, दिया पराडकर.

१४ वर्षांखालील मुले विजयी (जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण): आधिष पेडणेकर, लौकीक तळवडेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर, योगेश परुळेकर.

१७ वर्षांखालील मुली विजयी ( अ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल मालवण ) : पावनी मालणकर, याज्ञी गोसावी, सृष्टी दिघे, स्वरा परब.

१७ वर्षांखालील मुली उपविजयी ( भंडारी हायस्कूल, मालवण) : दुर्वा चिपकर, नक्षत्रा जावकर, सौरवी देसुरकर.

वैयक्तिक स्पर्धेसाठी इशांत वेंगुर्लेकर १७ वर्षाखालील मुले (टोपीवाला हायस्कूल) आणि दुर्वा चिपकर १७ वर्षांखालील मुली (भंडारी हायस्कूल) यांची निवड झाली आहे.

ही सर्व खेळाडू मुले व मुली दि.२५ आणि २६ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या सर्व खेळाडुंचे ‘महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग’ चे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर आणि सचिव हेमंत वालकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स