केंद्र सरकार देणार ७५ लाख नवीन एल पी जी गॅस सिलिंडर कनेक्शन्स ; प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता.
ब्यूरो न्यूज | नवी दिल्ली : सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी अनुदान जारी करण्यास मान्यता दिली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत १,६५० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने ३३ कोटी ग्राहकांच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती २०० रुपयांनी कमी केल्या होत्या. उज्ज्वला योजनेंतर्गत ग्राहकांना ४०० रुपये प्रति सिलिंडर स्वस्त मिळत आहे. आता ७५ लाख नवीन एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)