तोरसोळे फाटा येथे इंडिका कार आणि ट्रक यांच्या भीषण अपघात अपघातात आई - मुलाचा दुर्दैवी मृत्यू मन हेलावून टाकणारी घटना
शिरगाव | संतोष साळसकर: देवगड तालुक्यातील तोरसोळे फाटा येथे इंडिका कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्याने या भीषण अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. महेश मोहन तोरसकर ( मुलगा – ५२ ) व मनीषा मोहन तोरसकर ( आई – ७८ ) अशी मृतांची नावे आहेत. तर बाकी २ जखमी आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता गोवा येथे हलविण्यात आले. हा अपघात आज शनी रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या अपघातातील ट्रकचालक पसार झाला आहे. याबाबत अधिक वृत असे की, तळेबाजार येथील महेश मोहन तोरसकर6 (५२ ) , मनीषा मोहन तोरसकर (७८), गुरुनाथ श्रीधर पारकर (६०), श्रद्धा गुरुनाथ पारकर (५५) हे आपल्या इंडिका ( एम एच ०७ क्यू ३८५०) या कारने शिरगाव च्या दिशेने जात असताना समोरून देवगड कडे जाणारा ट्रक (सीजी १५- ९८१६) यांच्यात तोरसोळे फाटा येथील धोकायक वळणावर जबरजस्त धडक झाली. हा अपघात एव्हढा भीषण होता की इंडिका कार मधील मनीषा तोरसकर यांच्या डोक्याची कवठी फुटून धड वेगळे झाले. त्यांचा मुलगा महेश तोरसकर यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने या दोन्ही आई मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर गुरुनाथ पारकर आणि श्रद्धा पारकर हे जखमी झाले आहेत. श्रद्धा हिला मोठी दुखापत झाल्याने तिला गोवा येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच देवगड तहसीलदार रमेश पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री देवरे, पीएसआय – सुधीर कदम, संतोष भालेराव, आशिष कदम, राजन जाधव, निलेश पाटील, विशाल वैजल, आगा फकरुद्दिन, दिपेश तांबे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत व्यक्तींचे शवविच्छेदन शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार रामटेक, सफाईकार नंदू जाधव उपस्थित होते. या अपघाताची माहिती मिळताच शिरगाव, तळेबाजार, वरेरी येथील असंख्य सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)