ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महाराष्ट्र पोलीस म्हणजे राज्यातील महिलांसाठी 'बंधुत्वाचा' सर्वात भक्कम आधार ; महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा अध्यक्ष ज्योतिका हरयाण यांचे प्रतिपादन.

महाराष्ट्र पोलीस म्हणजे राज्यातील महिलांसाठी 'बंधुत्वाचा' सर्वात भक्कम आधार ; महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा अध्यक्ष ज्योतिका हरयाण यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 31 Aug 2023 06:35 AM
वाचन संख्या 217

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गने पोलिसांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन उत्सव.

कणकवली | प्रतिनिधी : महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी बंधुत्वाचा सर्वात भक्कम आधार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या भक्कम आधाराच्या जोरावरच आजची स्त्री बिनधास्तपणे समाजात वावरत आहे. त्यामुळे आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपले रक्षक असणाऱ्या कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हवालदार दाजी सावंत, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, आदी पोलीस बांधवांना जिल्हा सचिव सुप्रिया पाटील ,सदस्य संगीता पाटील, स्वरदा खांडेकर, सई पाटील यांनी राखी बांधून रक्षाबंधन सणाचे महत्व जपले.


अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून, परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात.

रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते, आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्य तत्पर असतात याची जाणीव महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीका हरयाण यांनी ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह विभागातील पोलीस जवानांना राखी बांधून या सणाचे महत्त्व जपले या बद्दल महिला उत्कर्ष समितीची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स