ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उद्योजकतेसाठी 'कोकण रत्न सन्मान २०२३' पुरस्कार प्रदान.

भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उद्योजकतेसाठी 'कोकण रत्न सन्मान २०२३' पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 31 Aug 2023 05:15 AM
वाचन संख्या 145

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारींग्रे गांवचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित ‘कोकण रत्न सन्मान २०२३’ हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सीने अभिनेते आणि सिंधू रत्न कलावंत मंचचे अध्यक्ष विजय पाटकर, सिंधू रत्न कलावंत मंच उपाध्यक्ष अलका कुबल, आदरणीय अजित फणसेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मनोहर शकुंतला नरे, गुरु मिठबांवकर, प्रदीप ढवळ म, प्रवीण आमरे, सचिन नारकर, हरी पाटणकर आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

कोकणातही यशस्वी उद्योजक होऊ शकतात व स्वतःबरोबर इतर कुटुंबांना देखील ते रोजगार मिळवून देऊ शकतात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच उद्योजक नवीनचंद्र बंदीवडेकर हे आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उद्योग क्षेत्र निवडले. मेहनत व चिकाटीच्या जोरावर उद्योग यशस्वी देखील करून दाखविला. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नवीन कलाकारांना विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे तसेच विविध सांस्कृतिक शिबिरे भरविण्यात नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा मोठा वाटा आहे. तसेच अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्षपदाची धुरा ते अनेक वर्ष सांभाळत असून भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी मोठे योगदान देशभरात दिलेले आहे. भंडारी समाजाला सर्व क्षेत्रात न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा कोकण रत्न सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले आजपर्यंत मी उद्योग क्षेत्रा साठी तसेच भंडारी समाजासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. उद्योग क्षेत्रात कोकणातील अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच भंडारी समाजाच्या उन्नतीसाठी यापुढेही मी तन-मन-धन अर्पण करून काम करेन. सिंधुरत्न कलावंत मंच ही संस्था अतिशय दिशादर्शक असे कार्य करत असून या संस्थेच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आजचा हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मला नेहमी सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्या परिवाराचा आहे. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते विजय पाटकर यांनी नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणालेत नवीनचंद्र बांदिवडेकर हे कोकणचे खरे रत्न आहे. आज नवीनचंद्र यांनी आपल्या कार्याचा ठसा देश पातळीवरती उमटविला आहे आणि आज या कोकण रत्नाचा सन्मान करताना खरोखर आम्हाला मनस्वी आनंद होत आहे यावेळी कोकण कला मंचाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि कोकणातील उद्योजक, कलाकार उपस्थित होते..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स