नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्षपदी सौ. लक्ष्मी मनोज सडवेलकर यांची निवड.
महिला सबलीकरण उद्देशांतर्गत नेरूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा निर्णय.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत मध्ये आज झालेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी सौ. लक्ष्मी मनोज सडवेलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नेरूर महिला सबलीकरणा अंतर्गत उचललेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल अशा भावना नेरूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने व्यक्त करण्यात आल्या.गेली १७ वर्षे नेरूर महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्षपदाला योग्य न्याय देणारे व ज्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दिमध्ये नेरूर गावाला ‘तंटामुक्त गाव’ हा शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला ते तंटामुक्त ग्रामसमितीचे माजी अध्यक्ष श्री. भास्कर गावडे यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील यावेळी संमत करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी नेरूर ग्रामपंचायत सरपंच, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व मोठ्या संख्येने नेरूर गावामधील ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)