ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीतील श्रीम. श्रीमती अणावकर कालवश ; नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या मातोश्री होत.

कणकवलीतील श्रीम. श्रीमती अणावकर कालवश ; नाभिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या मातोश्री होत.

प्रकाशन: 29 Aug 2023 10:24 PM
वाचन संख्या 75

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग नाभिक समाज संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या मातोश्री श्रीम. श्रीमती यशवंत अणावकर ( वय ८२ ) यांचे २७ ऑगस्टला सायंकाळी कणकवलीतील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले.

मंगळवारी २९ ऑगस्टला सकाळी कै. श्रीमती यशवंत अणावकर यांच्या पार्थिवावर कणकवली नगरपंचायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कणकवलीतील सर्व नागरीक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांनी, आपले व्यवसाय बंद ठेऊन उपस्थित होते.

राज्य संघटक विजय सि. चव्हाण व प्रविण कुबल यांनी श्रध्दांजली वाहतांना कै. श्रीमती अणावकर यांच्या जाण्याने नाभिक संघटनेचा आधार गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दु:ख व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, कणकवलीतील ज्ञातीबांधव आणि मित्रमंडळ उपस्थित राहून श्रध्दांजली वाहिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स