ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार

प्रकाशन: 04 Aug 2021 06:04 PM
वाचन संख्या 59

सिंधुदुर्ग । ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची आज भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी केली.त्यावर ना.हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जि.प. सदस्य नागेंद्र परब यांनी पुराव्यांसहीत आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध केले. जि.प. शाळांना जे वॉटर फिल्टर-कुलर पुरविण्यात आले त्यांची प्रत्यक्ष बाजारामध्ये १५ हजार किंमत असताना प्रत्यक्ष २० हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्याची बाब कागद पत्रांसाहित जि.प. सदस्य नागेंद्र परब यांनी सादर केली. काही शाळांना कोरी बिले देखील देण्यात आली आहेत. यामुळे १००५ शाळांना वॉटर फिल्टर-कुलर पुरविताना किमान ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला गेला असल्याचे निष्पन्न होते.
तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून केलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये झालेल्या ५० लाख रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचाराची आपले स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच यामधील दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मा. आयुक्त, कोंकण विभाग यांना देण्यात यावेत अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी पत्राद्वारे ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. याची दखल घेऊन ना.हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स