ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कासार्डे येथे धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कासार्डे येथे धडक कारवाई

प्रकाशन: 04 Aug 2021 05:32 PM
वाचन संख्या 54

गोवा बनावटी दारूसह  ८,५७,००० हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत

कणकवली | उमेश परब : कासार्डे विजयदुर्ग फाटयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने  सापळा रचून अवैध दारू वाहतुक करत असलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो ताब्यात घेतला असून गोवा बनावटीच्या मद्याची  ४,५७,०००/-किमतीची  दारू पकडली आहे.तसेच  सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर)  याला  अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ९ .३० च्या दरम्यान कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचण्यात आला.दोन पंच आणि स्टाफसह खाजगी वाहने तैनात करण्यात आली.कणकवली कासार्डे विजयदुर्ग फाटयावर सापळा रचला असता येणाऱ्या वाहन बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – 12 / KP 8533 हे थांबवून तपासणी केली या वाहनाच्या मागील दरवाज्यावर सील लावलेले होते . आतील मालाची बिल्टी वाहनामध्ये नव्हती . त्यामुळे अधिक संशय आल्याने तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याचे गोवा बनावटीचे १०१ बॉक्स व ५ बिअरचे बॉक्स असे एकूण १०६ बॉक्स मिळून आले . या गोवा बनावटीच्या मद्याची किंमत ४,५७,००० / एवढी आहे . दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेल्या बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MH – १२ / KP ८५५३ सापडला . सदर मिळून आलेले १०६ बॉक्स व बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो क्रमांक MII १२ / KP – ८५५३ व  रु ८,५७,००० / – किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला . सदर वाहनचालक सागर संजय सानप , (वय २४ वर्षे , रा . मु.पो. मेहेकरी , सानप वस्ती , ता . नगर , जि . अहमदनगर)  यांला  अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे . वाहतूककामी वापरण्यात आलेला बोलेरो मॅक्स सिटर टेम्पो  जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेला आहे . गेल्या आठवडाभरातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही दुसरी धडक आहे. कारवाई सदरील कारवाई  अधीक्षक डॉ . बी . एच . तडवी यांच्या मागदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव यांनी कारवाई केली . सदर कारवाईमध्ये  सहाय्यक दुय्यम निरीक्षकजी . एल . राणे ल ,  सुरज चौधरी  , जे . आर . चव्हाण , श्रीमती स्नेहल कुवेसकर यांनी मदत केली .  साजीद शहा , खान यांनी मदत केली . पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी.सी. जाधव  आहेत .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स