ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीतील अर्जुन रावराणे विद्यालयात रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन.

वैभववाडीतील अर्जुन रावराणे विद्यालयात रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 28 Aug 2023 01:42 PM
वाचन संख्या 165

उद्या वैभववाडी तालुका आत्मा समिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालय व रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांचा संयुक्त उपक्रम.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका आत्मा समिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालय वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २९ ऑगस्टला अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी येथे रान भाजी प्रदर्शन व रान भाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० :३० वाजता होणार आहे. आजच्या तरुण पिढीला आहारातील रानभाज्यांचे महत्त्व त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती मिळण्यासाठी व आहारातील रानभाज्यांची असलेली परंपरा पुढे चालू राहण्यासाठी त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या स्पर्धेत महिला महिला बचत गटांना सहभाग घेता येणार असून पाककलेतील विजेत्या महिलेला प्रथम क्रमांक रुपये १०००/_ व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक ७५०/_ रुपये तृतीय क्रमांक ५००/रुपये उत्तेजनार्थ ३००/ रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट व महिलांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान आत्मा समितीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे व तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स