ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'गांवमामी' उर्फ अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संजय आग्रे(बाळासाहेबांची  शिवसेना तथा शिंदे गट)  यांच्या हस्ते नारळ लढविणे स्पर्धेचे उद्घाटन.

'गांवमामी' उर्फ अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संजय आग्रे(बाळासाहेबांची शिवसेना तथा शिंदे गट) यांच्या हस्ते नारळ लढविणे स्पर्धेचे उद्घाटन.

प्रकाशन: 28 Aug 2023 12:08 PM
वाचन संख्या 190

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेला कणकवलीत मिळाला भरघोस प्रतिसाद.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षा तर्फे काल २७ ऑगस्टला नारळी पोर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सध्या महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेतील ‘गांवमामी’ उर्फ अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी व जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेतील महिला गटात रेश्मा वनस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर पुरुष गटात प्रणय गुरसाळे यांनी बाजी मारली. ही स्पर्धा कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली. या स्पर्धेला महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा प्रमुख शेखर राणे, सचिव किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख सुनिल सावंत, दामू सावंत, तालुका समन्वयक सुनील पारकर, सुनील हरमळकर, कुडाळ तालुका प्रमुख बंडू तुळसकर, महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट, कणकवली महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, शहर प्रमुख बाळू पारकर, भास्कर राणे, कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स