ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी उद्या ११ व परवा १२ ऑगस्टला पुन्हा एकदा मोफत मार्गदर्शन शिबीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी उद्या ११ व परवा १२ ऑगस्टला पुन्हा एकदा मोफत मार्गदर्शन शिबीर.

प्रकाशन: 10 Aug 2023 01:37 PM
वाचन संख्या 210

आमदार वैभव नाईक यांचा पुढाकाराने विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौंडेशन कोल्हापूर यांचे आयोजन.

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : तलाठी भरती २०२३ साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबीर जुलै महिन्यात घेण्यात आले होते. या शिबिराला परीक्षार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन झाल्याने पुन्हा एकदा हे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी केल्याने उद्या शुक्रवार ११ ऑगस्ट व शनिवार १२ ऑगस्टला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ९.३० ते ५ या वेळेत हे मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

अरुण नरके फौडेशन कोल्हापूर ही संस्था स्पर्धा परीक्षा व सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षाचा अनुभव असणारी विश्वनीय संस्था आहे. आजपर्यंत त्यांचे ४६५० विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत.या संस्थेचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्हावे आणि सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी तलाठी व्हावेत यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल – कणकवलीच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा होणाऱ्या तलाठी भरती मोफत मार्गदर्शन शिबीराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घावा, अधिक माहितीसाठी श्री. समीर कुंभार मोबा- ९१४२४३४४४८ श्री. तेजस मडवळ मोबा- ८७६७०९५०११ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स