ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राकेश परब यांची 'सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी.' विषय निदेशक अध्यक्ष पदी निवड..!

राकेश परब यांची 'सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी.' विषय निदेशक अध्यक्ष पदी निवड..!

प्रकाशन: 10 Aug 2023 02:24 PM
वाचन संख्या 181

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (एम.एस.एफ.सी.) निदेशक संघटनेची कार्यकारणी सभा रवळनाथ मंदिर सभागृह ओरस, येथे संपन्न झाली. या सभेला मालवण, कणकवली, सावंतवाडी, तालुक्यातील सर्व शाळेमधील एम.एस.एफ.सी. विषय शिकवणारे निदेशक उपस्थित होते. नववी ते दहावी इयत्ता पर्यंत हा अभ्यासक्रम शिकवीला जातो या निदेशकांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारणी ठरवण्यात आली.

विनायक दळवी ( सचिव )

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी. विषय निदेशक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. राकेश परब यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण हायस्कूल, ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले यांची निवड करण्यात आली. सचिवपदी शंकर महादेवन विद्यालय कुंभवडे अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री. विनायक दळवी यांची निवड आली. तर खजिनदारपदी श्री शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाट, मालवण येथील अभियांत्रिकी विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य सौ. रिया देसाई, श्री. भूषण सावंत, सौ.गायत्री देसाई, कुमारी कविता माडीये, सौ. नेहा गवंडे, कु. हर्षदा पाटकर, दर्शना मयेकर, तुळशीदास पावसकर यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील या विषयातील शिकवणा-या निदेशकांच्या समस्या सोडवण्यासाठी या संघटने मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहे.

जगन्नाथ आंगणे (खजिनदार)

श्री राकेश परब व इतर कार्यकारिणी सहकार्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स